मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 9, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट


मुंबई  : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकटे चिरंजिव तेजसला वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे. तेजसचा 7 ऑगस्टला वाढदिवस होता. उत्तर-पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात गोगलगाईंचा अभ्यास करण्यासाठी तेजसला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी म्हणजे तेजससाठी वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट असल्याचं बोललं जात आहे.

तेजसनं नुकताच उत्तर-पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगलगाईंचे संशोधन करण्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली. विशेष म्हणजे तेजसच्या वाढदिवशीच त्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी तेजस ठाकरेसह अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले हे देखील जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजिव तेजस ठाकरे यांनी गोगलगाईसंदर्भात उत्तर-पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्याबद्दल भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी तेजसचं कौतुक केलं आहे. आमदार आशिष शेलार यांनी तेजसचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->